Just another WordPress site

उत्कृष्ठसेवा दिल्याबद्दल ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय”आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन अतिदुर्गम क्षेत्रात गाडऱ्या जामन्या या आदीवासी गावात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा दि.४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या “आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जळगाव येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात दि.४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते व पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील,भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश मामा भोळे,जिल्हाधिकारी अमन मित्तल,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, ग्रामसेवक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजिव निकम,ग्रामसेवक संघटना जिल्हा अध्यक्ष नंदकुमार आप्पा गोराळे सर्व सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे व यावल गटविकास अधिकारी डॉ.मंजूश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा दि.४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या “आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावल तालुक्यातील गाडऱ्या जामन्या या सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रात २o१६ ते २०१७ या कालावधी पासून मागील अनेक वर्षापासुन प्रशासकीय सेवा करीत आदीवासी परिसरातील ग्रामीण भागात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रुबाब मोहम्मद तडवी यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे.सेवानिवृत्तीच्या अगदी जवळ असलेल्या ग्रामसेवक रूबाब तडवी यांना सदरील राज्यस्तारिय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेहमुदा तडवी,मुलगी अंजली तडवी व मुलगा राहुल तडवी उपस्थित होते.रूबाब तडवी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव पी.व्ही.तळेले,हितु महाजन,मजीद तडवी,राजु तडवी,बि.के.पारधी,सुबोत सोहे,रविन्द्र बाविस्कर,रूपाली तळेले,दिपक तायडे,डी.एस.तिडके,सोनाली सोनवणे,भोजराज फालक,प्रियंका बाविस्कर यांच्यासह ग्रामसेवक संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.