सादिक शेख,पोलीस नायक
धामणगाव बढे(प्रतिनिधी):-येथील ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नाने तसेच तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या सात आठ वर्षांपासून डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वर्गाची स्थापना करण्यात आलेली आहे.मात्र याठिकाणी कुठल्या दानशूर व्यक्ती वा संस्थेकडून अभ्यासाकरिता स्पर्धा परीक्षेची पुस्तके किंवा वाचनीय साहित्य उपलब्ध होत नव्हती.सदरील बाब लक्षात घेऊन येथील ठाणे अंमलदार सुखदेव भोरकडे यांनी स्वखर्चाने या अभ्यासिका वर्गाला २० हजार रुपयांपर्यंतची स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करून धामणगाव बढे आवारात शांतता कमिटीच्या बैठकीच्या वेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट देण्यात आलेली आहेत.सुखदेव भोरकडे यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या अभ्यासिका वर्गातील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत हे विशेष!
याबाबत अधिक माहिती अशी की,येथील ग्रामपंचायतीच्या वतीने व तत्कालीन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या दूरदृष्टिकोनातून गेल्या सात आठ वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वर्ग सुरु करण्यात आला.परंतु याठिकाणी वाचनीय साहित्य वा स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपल्या स्वखर्चाने किंवा जुने पुस्तके पाहून अभ्यास करावा लागत होता.सदरील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन येथील ठाणे अंमलदार सुखदेव भोरकडे यांनी आपल्या स्वखर्चाने या अभ्यासिका वर्गाला लागणारी स्पर्धापरीक्षेची वीस हजार रुपयांची पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत.सदरील पुस्तकांची भेट त्यांना शांतता समितीच्या बैठकीच्या वेळी देण्यात आली.ठाणे अंमलदार सुखदेव भोरकडे यांच्या या स्तुत्य निर्णयाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
यावेळी आयोजित बैठकीत बोलतांना नवनिर्वाचित ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,या अभ्यासिका वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उच्च पदावर जाण्याची कास धरल्यास कुठलाही विद्यार्थी त्यात अपयशी होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता सर्वांना एकसमान वागणूक देऊन प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे नमूद केले. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या उच्च पदावरील प्रवासादरम्यानची माहिती उपस्थितांना दिली.तसेच ग्रामपंचायत सदस्य वसीम कुरेशी, रविशंकर मोदे, किशोर मोदे,अलीम कुरेशी यांनी देखील अभ्यासिका वर्गाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी काँग्रेस नेते धनराज महाजन, गजानन घोंगडे, पत्रकार सादिक शेख,इसाक पटेल,नवीन मोदे,वसंत जगताप,रशीद पटेल यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाघमारे सर यांनी तर आभार गजानन घोंगडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेकरीता ठाणे अंमलदार सुखदेव भोरकडे व धामणगाव बढे पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.