संतोष भालेराव,अमरावती
पोलीस नायक (प्रतिनिधी):-
होळीनिमित्त आयोजित पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाला खासदार नवनीत रवि राणा व बडनेरा मतदार संघाचे आमदार रवीभाऊ राणा
यांनी चक्क मेळघाटातील आदिवासी पाड्यांवर भेट देऊन प्रत्येक गावातील आदिवासी बांधवांना होळीच्या व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपला मेळघाट दौरा राणा दाम्पत्याने टूव्हीलरने केला हे विशेष!
मेळघाट दौरा प्रसंगी खासदार नवनीत रवि राणा व बडनेरा मतदार संघाचे आमदार रवीभाऊ राणा या दाम्पत्याने अतिशय काबाडकष्ट करून स्वतःच्या संसाराला हातभार लावणाऱ्या वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी चक्क खासदार नवनीत राणा यांनी एका आदिवासी महिलेच्या चहा कॅन्टीनवर स्वतःच्या हाताने चहा बनवून वाटप केली.तसेच यावेळी मार्गदर्शन करतांना खा.नवनीत राणा यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,महिलांचे मनोबल कमालीचे वाढले असून देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजाच्या महिलेला संधी मिळणे हि मोठी गर्वाची बाब आहे.तसेच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपतिपदाची जबाबदारी कुशलतेने व यशस्वीपणे सांभाळत आहेत हे आदिवासींसाठी निश्चितच गौरवास्पद व अभिमानास्पद आहे.महिला सक्षमीकरणासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे खासदार नवनीत रवि राणा यांनी यावेळी प्रतिपादन केले.प्रसंगी खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत पारंपरिक आदिवासी नृत्याचा फेर धरून लुटला.तर आमदार रविभाऊ राणा यांनी ढोलकी वादन करून आदिवासींचा उत्साह वाढविला.यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवीभाऊ राणा या दाम्पत्याने गावोगावच्या भेटीत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याचे निराकरण करण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या.प्रसंगी कामात हयगय करणाऱ्या व कामचुकारपणा करून आदिवासींना विनाकारण त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांची खासदार नवनीत राणा यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.या मेळघाट दौऱ्यादरम्यान खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवि राणा यांनी बारू नाका,भांडूम,बिजू धावडी,बारू,जूट पाणी,मांडवा, कुसुमकोट बु,धारणी,राणीखेडा,अंबाडी,दाबीदा,नागुढणा,झिल्पि,सादराबडी,सुसरदा,नागझिरी,नारदू,शीवझीरी,हिराबंबई,दादरा आदी अतिदुर्गम गावात दुचाकीने जाऊन भेटी दिल्या.
यावेळी गावागावातील आदिवासींना फगवा व व्हॉलीबॉल किट वाटप करण्यात आले तसेच विविध गावात युवा स्वाभिमान पार्टी शाखांचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले.यावेळी उपेन बचले,अनुप अग्रवाल,दुर्योधन जावरकर,देवेंद्र टीब,मुकेश मालवीय,मनीष मालवीय,राजेश वर्मा,संस्कार नवलाखे,वर्षा जयस्वाल,खूष उपाध्याय,वैभव गोस्वामी,शुभम उंबरकर,राहुल काळे,मंगेश कोकाटे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.