यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आजपासून दोन दिवस चालणाऱ्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे.आज दि.६ रोजी गावठाणावरील मोकळ्या पटांगणावर मोठ्या भावनिक वातावरणात व उत्साहात होळी दहन करण्यात आले.
याबाबत अधिक वृत्त असे की,आज दि.६ मार्च रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने गावठाण परिसरातील मोकळ्या जागेवर मोठ्या उत्साहात होळी दहन करणात आले.यानिमित्त वैद्य प्रकाश उखाजी झोपे यांच्याकडून होळीची पूजा साहित्य आणण्यात आलेले होते.यावेळी गावातील वैद्य व प्रतिष्ठित व्यक्ती यांना वाजत गाजत होळी दहन ठिकाणापर्यंत आणण्यात आले.त्याठिकाणी ब्राम्हण डिगंबर जोशी यांनी वैदिक मंत्र पठण करून होळीची पूजा करण्यात आली.तत्पूर्वी होळीचा दांडा हा ग्रामपंचायत कार्यालयातून सजवून होळी ठिकाणापर्यंत मनोभावे वाजत गाजत आणण्यात आला.यात युवक वर्गाने होळीचा दंड नाचविण्याचा कसब दाखविला.यावेळी युवकांमधील आनंदोत्सव वाखाणण्याजोगा होता.होळीपूजनानंतर होळी पेटवून आंनदोत्सव साजरा करणात आला.
यावेळी गावातील वैद्यलोक प्रभाकर उखाजी झोपे,प्रकाश उखाजी झोपे,विजय चिंधू झोपे,सुनील मुरलीधर झांबरे,कांतीलाल लालचंद झोपे,पंकज प्रकाश झोपे,दिनेश राजेंद्र झोपे,प्रमोद पाटील,नेमिनाथ झांबरे,नितीन भिरूड,भगवान लोहार,अरविंद पाटील,शंकर वारके,गणेश राणे,संजय सरोदे,नितीन पाटील,चंद्रकांत भिरूड,राहुल आढाळे,अमोल पाटील,पोपट पाटील,विलास झांबरे,चेतन पाटील,मयूर जावळे,ललित शिंपी,युवराज पाटील,रवींद्र बऱ्हाटे,हेमराज सरोदे,पंकज झांबरे,जयंत महेश्री,सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगाडे,ग्रा.पं सदस्य डॉ.राजेंद्र कुमार झांबरे,मनोहर महाजन,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,कल्पना पाटील,शकीला तडवी,शबनम तडवी,हेमलता जावळे,रबील तडवी,वसीम तडवी,लक्ष्मण भिरूड,जानकीराम पाटील,डॉ.पराग पाटील,यदुनाथ पाटील,सचिन राणे,रत्नाकर चौधरी,लिलाधर पाटील,हेमचंद्र भिरूड,हिरालाल जावळे,पवन राणे,मधुकर पाटील,मनोज झोपे,विनायक पाटील,दिनकर पाटील,रुपेश पाटील,योगेश ठोंबरे,डिगंबर खडसे,दत्तात्रय गुरव,किरण भिरूड,विद्याधर सरोदे,गणेश जावळे,बंटी पाटील,खुशाल कोळी,दत्तू धनगर,रबील तडवी,शेखर पाटील,लिलाधर जंगले,गंगाधर तायडे यांच्यासह श्री.खंडेराव महाराज मंदिर ट्रस्ट तसेच सर्व जातीधर्मातील तरुण वर्ग यांनी होळी दहन कार्यक्रमात सहभाग नोंदविला.यावेळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहीफडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.अशोक बाविस्कर,पो.कॉ.किशोर परदेशी,पो.ना.संदीप सूर्यवंशी,गृह रक्षक दलाचे मयूर तायडे,संजय धनगर,सुनील कोळी,धनराज मोरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.