यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील अट्रावल येथे दि.५ मार्च रोजी विहीरीच्या कामासाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरल्याने विहिरीत पडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील अट्रावल येथील मजूर भिमराव अंकात कोळी,वय ५० वर्षे हे दि.५ मार्च रोजी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास गावातील मुंजोबा गेटजवळ असलेल्या गावच्या ग्रामपंचायत विहीरीवर खोदकाम करीत असतांना विहीरीत खाली उतरत असतांना पाय सटकल्याने विहीरीत खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते विहीरीतच मरण पावले.याबाबत मयताचा पुतण्या लखन दिनकर कोळी वय ३० वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने यावल पोलिसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे.