यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डांभुर्णी येथील गावातलगत असलेल्या खळ्यातुन एका शेतकऱ्याची ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीस अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतकरी तनोज काशिनाथ पाटील वय ४५ वर्ष या शेतकऱ्याच्या गावालगत असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतातील खळ्याला कम्पाउंड असुन गेट लावला आहे.या खळयात बांधलेल्या सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या बैलजोडीस कुणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेले आहे.याबाबत फिर्यादी तनोज पाटील यांनी दि.४ मार्च रोजी सायकाळी ७:३० वाजता चारापाणी टाकण्यास गेले होते त्यानंतर दि.५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पाटील हे पुन्हा आपल्या खळयात गेले असता त्यांना बैलजोडी दिसुन आली नाही.फिर्यादीचे वडील व इतर सर्वांनी चोपडा व यावल परिसरात बैलजोडीचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही.याबाबत तनोज पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांच्या विरुद्ध ७० हजार रुपये किमतीच्या बैलजोडी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र पाटील हे करीत आहे.