यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील श्री मनुदेवी आदीवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये स्कुलच्या वतीने अहंकार,आळस,बुराई,ईर्षारूपी प्रतिकात्मक होळी करून विदयार्थ्यांच्या हस्ते होळी दहनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेत होळीची सजावट करण्यात आली.प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सौ.तिलोत्तमा महाजन यांनी विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व समजावून सांगीतले.यावेळी मुख्याध्यापिका शिला तायडे व सर्व शिक्षकवृंद व विदयार्थी तसेच कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रविणा पाचपांडे यांनी स्कुलच्या कृष्णतारा नगर मधील परिसरातील मैदानावर होळीची पूजा केली व विद्यार्थ्यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करून होळी दहनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा केला.यावेळी श्री मनुदेवी आदीवासी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष शेलेद्र महाजन व प्रशांत फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.