गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी):-
खासदार नवनीत रवि राणा व आमदार रवीभाऊ राणा यांचा सद्या मेळघाट दौरा सुरु आहे.या दौऱ्यादरम्यान राणा दाम्पत्याने मेळघाटातील सर्व आदिवासी वाड्यावस्त्या व गावे पिंजून काढत आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यामध्ये मिळूनमिसळून जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून काल दि.६ रोजी राणा दाम्पत्याने चक्क आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करून त्यांचा उत्साह वाढविला.
होलिकोत्सवाच्या पावन पर्वावर मेळघाट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी आमदार रवि राणा व खासदार नवनीत राणा यांनी दुचाकीवर गावोगावी जाऊन आदिवासी बंधू भगिनींना होळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.होळीपूजन करतांना खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी सोबत पारंपारीक नृत्य करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला आणि आमदार रवी राणा यांनी यावेळी फगवा वाटप करून आदिवासी बंधू भगिनींचा उत्साह वाढविला.तसेच या मेळघाट दौऱ्यात आदिवासींना होळीच्या आनंदासोबतच करोडो रुपयांच्या विकासकामांची भेट देऊन आपण खऱ्या अर्थाने मेळघाटच्या कन्या असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सिद्ध केल्याने गावोगावी नागरिकांनी राणा दाम्पत्याचे जल्लोषात स्वागत केले.इडा,पीडा जाऊन आदिवासींच्या जीवनात विकासाची पहाट येवो तसेच शेतकरी,शेतमजूर यांच्यावरील संकटे जळून राख व्हावी व शेतकरी,व्यापारी,सर्वसामान्य नागरिक यांना सुख समृद्धी शांती लाभावी यासाठी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात पर्यावरणपूरक होळीचे पूजन करून आदिवासी बंधू भगिनींकरिता प्रार्थना केली.
दौऱ्यादरम्यान राणा दाम्पत्याने हापशीजवळ तहानलेल्या गाईंना हँडपंप चालवून गाईंना पाणी पाजून गोमातेची सेवा केली.आदिवासी बांधवाच्या छोटया हॉटेलमध्ये खासदार नवनीत राणा यांनी स्वतःच्या हाताने पालकाचे भजे तयार करुन आपल्या सहकारी शिलेदारांना व आदिवासी बांधवांना आनंदाने खाऊ घातले.मेळघाट दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी पळसकुंडी,जामपाणी,बारतांडा,टेम्बुरखेडा,सावलीखेडा,डाबका,धुळघाट रोड,कलमखार,गोंडवाडी,चिचघाट,दिया,लवादा,चित्री आदी गावांमध्ये जाऊन होळीपूजन,रंगोत्सव,फगवा वाटप,नागरीकांच्या समस्या ऐकून निराकरण करणे,विकासकामांचे भूमिपूजन आणि व्हॉलीबाल किटचे वाटप करण्यात आले.