Just another WordPress site

किनगाव येथे आसेमच्या वतीने “अल्पदरात समाजसेवा” योजनेअंतर्गत सीएससी केंद्राचे उद्धघाटन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील किनगाव येथे आदीवासी सेवा मंडळ संघटनेच्या वतीने “अल्पदरात समाजसेवा” योजनेअंतर्गत ऑनलाईन सिएससी सेंटरचे उदघाटन आदीवासी सेवा मंडळ आसेम कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इरफान तडवी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी आसेमं ऑनलाईन सिएससी सेंटर स्थापना दिवस ४ एप्रिल २०२२ पासून तर आज पर्यंतच्या केलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला व पुढील वर्षाचे नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी आसेम कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इरफान तडवी व अनिल नजीर तडवी गुरुजी यांनी सिएससी केन्द्रामुळे अनेक आदिवासी सामाजातील गोरगरीब लोकांना केन्द्र शासन व राज्य शासनाच्या नवनवीन विधायक व समाज उपयोगी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उपयोगी दाखले काढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.तसेच आसेम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजु तडवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,या ऑनलाईन सेंटरच्या माध्यमातून “अल्पदरात समाजसेवा”हि योजना राबविली जाणार असून संस्थेच्या माध्यमातुन लवकरच यावल,सावदा,फैजपुर,विवरा,रावेर या ठिकाणी आसेमं ऑनलाईन सेंटर सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगीतले.यात सावदा शहरातील सिएससी केन्द्र राजु तडवी हे स्वखर्चाने चांगला संगणक संचालक मिळाल्यास लवकरच तिथेही सेंटर सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आसेम संघटनेचे संथापक अध्यक्ष राजु बिऱ्हाम तडवी,अनिल नजीर तडवी,इरफान तडवी,डॉ.लुकमान तडवी,गफूर तडवी,एलआयसी अधिकारी सलीम तडवी,सिराज तडवी,शरीफ तडवी,मुन्ना तडवी,सद्दाम तडवी मालोद,रहीम तडवी मालोद,युसूब शाह,नासिर शेख,व कवी बि.राज तडवी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.