यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. ८ मार्च २०२३ रोजी विद्यार्थी विकास विभाग राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार हे होते तर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील यांनी महिला दिन साजरा करण्यामागील भूमिका व पार्श्वभूमी याविषयी मार्गदर्शन करत आजपर्यंतच्या इतिहासातील आदर्श स्त्रियांचा दाखला देऊन आज एकविसाव्या शतकात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे विशद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.एम.डी.खैरनार यांनी राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,रमाई आंबेडकर यांचा आदर्श महिलांनी घेऊन तसेच कामगार चळवळीतून आंदोलन उभारणार्या क्लारा झेड स्किन या महिलांचा आदर्श महिलांनी ठेवावा तसेच समाज सुधारकांच्या प्रयत्नातून १९१० मध्ये ठराव होऊन महिला दिन साजरा केला जातो असे मार्गदर्शनातून सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश जाधव व आभार प्रा.डॉ.सुधीर कापडे यांनी मानले.कार्यक्रमास डाॅ.पी.व्ही.पावरा,डॉ.एच.जी.भंगाळे,प्रा.भारती सोनवणे,डॉ.निर्मला पवार,डॉ.वैशाली कोष्टी, प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.सी.टी.वसावे,प्रा.धनश्री राणे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.