संतोष भालेराव,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-
जागतिक महिला दिनानिमित्त युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अधिकारी,कर्मचारी व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच कष्टकरी श्रमजीवी स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.सदरील कार्यक्रम खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने राबविण्यात आला.यानिमित्त अमरावती जिल्ह्यातील विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे,जिल्हाधकारी श्रीमती पवणीत कौर,पोलिस सहायुक्त पुनम पाटील,महिला वाहतूक पोलिस अधिकारी रूपवती राठोड,शिल्पा डोंगरे तसेच गेल्या १८ वर्षापासून ज्यूस सेंटर चालवून स्वाभिमानाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शकुंतला चक्रे,सुनीता गोमाजी चक्रे या मायलेकिंचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
आज महिला या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक जबाबदारी सक्षमतेने पार पाडत आहेत.महिलांचा आदर करणे व महिलांच्या भावनांचा सन्मान करून त्यांना सातत्याने बरोबरीचे स्थान देणे हे युवा स्वाभिमान पार्टीचे ब्रीद असल्याने आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वाभिमान पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,महिला अध्यक्षा व माजी सभापती श्रीमती सुमती ढोके,संघटक नितीन बोरकर,ग्राहक मंच शहर अध्यक्ष पराग चिमोटे,सौ कांताताई रमेशराव काळे,माध्यम समन्वयक अजय बोबडे,रवी वाघमारे यांनी विविध ठिकाणी जावून या कर्तव्यदक्ष,कार्यक्षम व ध्येयवादी महिलांचा सत्कार करून त्यांना व समस्त मातृशक्तीला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.