यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली “शाश्वत विकास” या विषयावर वेबिनार उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी केले.यावेळी प्रा.डॉ.सुनिल गोसावी (तळोदा महाविद्यालय ) यांनी शाश्वत विकासासाठी अक्षय उर्जा या विषयावर मार्गदर्शन करतांना त्यांनी अक्षय उर्जेची संकल्पना मांडली त्याचबरोबर त्याचे फायदे व महत्व विषद केले.तर प्रा.डॉ.मनोज जाधव (प्राणीशास्र विभाग प्रमुख,नाहाटा महाविद्यालय,भुसावळ )यांनी शाश्वत विकास इतिहास आणि आराखडा या विषयावर मार्गदर्शन करतांना भारताच्या शाश्वत गरजा,मानवी परिषद,पर्यावरण,कंपनी व वेगवेगळे आयोग यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
दूपार नंतरच्या सत्रात प्रा.डॉ.चेतन शर्मा (आय.क्यु.ए.सी.समन्वयक,बोदवड महाविद्यालय)यांनी शाश्वत विकास व जैव किटकनाशके या विषयावर मार्गदर्शन करतांना जैव तंत्रज्ञान,शाश्वत शेती,शेत-मशागत व पीक पध्दती,पीकांचे वाढते उत्पन्न,अन्नातील पोषणतत्व याबद्दल माहिती दिली.प्रा.डॉ.सुरेखा पालवे (अधिसभा सदस्य क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव )यांनी शाश्वत विकास इतिहास आणि आराखडा या विषयावर मार्गदर्शन करतांना भारताचा शाश्वत विकास,औद्योगिक क्रांती,इंजिन शोध,हरित क्रांती,ग्रामीण व शहरी भागातील पायाभुत सुविधा,२०१५ ते २०३० पर्यंतची उदिष्ट्ये सविस्तर मांडली.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात शाश्वत भारताचा विकास व आजची सद्यस्थिती याविषयी विचार मांडले.यावेळी विद्यार्थीनी पुजा पाटील (एस.वाय.बी.एस्सी.),तेजश्री कोलते(एफ.वाय.बी.ए.)यांनी वेबिनार विषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी केले तर उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांनी आभार मानले.
यावेळी प्रा.डॉ.हेमंत भंगाळे,प्रा.डाॅ.आर.डी.पवार,प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.सुभाष कामडी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.मिलींद मोरे,प्रा.संजय पाटील, प्रा.मुकेश येवले,मनोज पाटील,प्रा.सी.टी.वसावे,प्रा.ईश्वर पाटील,प्रा.गणेश जाधव,प्रा.भारती सोनवणे,प्रा.डॉ.निर्मला पवार,डॉ.वैशाली कोष्टी, प्रा.धनश्री राणे यांच्यासह ९२ विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेकरिता मिलींद बोरघडे,संतोष ठाकूर,प्रमोद कदम,अमृत पाटील, प्रमोद जोहरे,प्रमोद भोईटे आदींनी परिश्रम घेतले.