यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी)येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक प्रस्तुत अभ्यास केंद्र यावल क्र.(सांकेतांक-५३८८ए )यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाविद्यालयाच्या प्राचार्या व केंद्र प्रमुख डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचणारे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तसेच काही काळ देशाचे उपपंतप्रधानपद व संरक्षणमंत्री म्हणुन कार्य केलेले यशवंतराव चव्हाण यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य व केंद्र संयोजक प्रा.अर्जुन पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी केंद्र सहाय्यक संतोष ठाकूर,टेक्नीकल सहाय्यक मिलींद बोरघडे,प्रा.मनोज पाटील,प्रा.सुभाष कामडी,अनिल पाटील यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.