यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील दुसखेडा येथील रहिवाशी जितेंद्र शांताराम सपकाळे यांची खान्देश विभाग कर्मचारी कोळी महासंघाच्या खान्देश विभाग अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्ती खान्देश विभाग कर्मचारी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
जळगाव,धुळे,नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात कोळी समाजातील कर्मचाऱ्यांना काम करीत असतांना जातीच्या दाखला संदर्भात अडचणी निर्माण होत आहेत.सदरील अडचणी सुलभपणे सोडविणे तसेच अनेक कर्मचारी अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गतुन नोकरीला लागलेले असतांना त्यांना आजपावेतो न्यायालय आदेशाशिवाय एकालाही वैधता प्रमाणपत्र समितिच्या वतीने देण्यात आलेले नाही.हा प्रकार म्हणजे मुद्दामपणे समाज बांधवांना त्रास देण्यासारखाच आहे.यात कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्कर मानसिक त्रास दिला जात असून या त्रासाला कंटाळून अनेक कर्मचारी यांनी आत्महत्या केल्या आहेत.नोकरी गेल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून सरकार याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत आहे. शासनाने याबाबतीत न्यायाची भूमिका घेणे अपेक्षित असतांना यात राजकारण केले जात असून कोळी बांधवांना वेठीस धरले जात आहे.अनेक वर्षांपासून कोळी कर्मचारी बांधवांच्या वतीने हा लढा अविरतपणे लढला जात आहे परंतु राजकारण्यांकडून याकडे सदैव दुर्लक्षच केले जात आहे.याबाबत मागील काळात अनेक कोळी समाज बांधवांनी मोठा संघर्ष केला त्या सर्व समाजबांधवाचे मार्गदर्शन घेऊन हा लढा मला दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून पुढे न्यायचा असल्याचे मत नवनियुक्त अध्यक्ष जितेंद्र सपकाळे यांनी व्यक्त केले आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल आमदार रमेश पाटील,आमदार लताताई सोनवणे,प्रभाकर गोटू सोनवणे,कैलासआप्पा सोनवणे,अश्विनभाऊ सोनवणे,मुकेश सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे,सुभाष सोनवणे,संदिप कोळी यांच्यासह कोळी बांधवांकडून अभिनंदन केले जात आहे.