Just another WordPress site

यावल तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा खरेदी नोंदणीस मुदतवाढ

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती व उप अभिकर्ता संस्था म्हणुन कार्य करीत असलेल्या कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असुन सन २०२२-२३ वर्षात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडतर्फे रब्बी हंगामातील हरभरा खरेदीस नुकतीच मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याबाबत कोरपावली येथील केंद्र उपअभिकर्ता संस्था म्हणून कार्यरत असलेल्या कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत हरभरा खरेदीसाठी नावनोंदणी जिल्हा पणन अधिकारी यांचे आदेशानुसार १ मार्च २०२३ ते १५ मार्च २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती.यात आतापर्यंत ७७५ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली असून आता नवीन पत्रकाअन्वये ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सोसायटी चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी कळविले आहे.

शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधारकार्ड झेरॉक्स,बँक पासबुक झेरॉक्स,हरभरा पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा पिकपेरा नोंदविलेला ७/१२ उतारा घेऊन संस्थेशी संपर्क साधावा.शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती बिनचूक द्यावी अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते.यात हमीभाव ५३३५ रुपये,उत्पादकता १३५० किलो हेक्टरी अशी असून शेतकऱ्यांनी या मुद्दतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.