Just another WordPress site

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी व दंड

कराड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेडछाड करणाऱ्या संतोष पवार या तरुणाला फारच महागात पडले आहे.कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के.एस.होरे यांनी संतोष उत्तम पवार(वय-३२ राहणार आगाशिवनगर,ता.कराड)यास एक वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच दंड न भरल्यास त्यास पुन्हा एक महिन्याची साधी कैद सुनावली आहे.सडकछाप मुलांकडून मुलींच्या छेडखानीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यास आळा घालण्यासाठी कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के.एस.होरे यांनी दिलेली हि शिक्षा फारच महत्वपूर्ण मानली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी.शहा यांनी दिली आहे.

याबाबत सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी.शहा यांनी दिलेली माहिती अशी कि,जानेवारी २०२१ मध्ये कराड येथील विद्यानगर कॉलेज परिसरात संतोष पवार याने पीडित कॉलेज युवतीचा मोटरसायकल वरून पाठलाग करून पीडित मुलीचा हात धरून तू मला फार आवडतेस अशी भाषा वापरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.हि बाब पीडित विद्यार्थिनीने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर कराड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली.याबाबत पोलिसांनी याची गंभीर दखल घेत कराड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एस.एस.चोरगे यांनी तपासचक्र फिरवून संशयित संतोष पवार यास अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.याकामी पीडित मुलगी तिची मैत्रीण,पंच व तपासी अधिकारी यांनी नोंदविलेल्या साक्षी तसेच सरकारी वकील यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने संतोष पवार यास एक वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच दंड न भरल्यास त्यास पुन्हा एक महिन्याची साधी कैद सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी.शहा यांनी काम पहिले.त्यांना पो.कॉ.अशोक मदने,गोविंद माने यांचेसह पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.