मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील सर्व महिलांना राज्य परिवहन मंडळाच्या बस प्रवास भांड्यामध्ये ५० % सवलत नुकतीच घोषित करण्यात आली आहे.सदरील घोषणेच्या अनुषंगाने दि.१७ मार्च २३ पासून “महिला सन्मान योजना”अंतर्गत सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस भाड्यामध्ये ५० % सवलत लागू करण्यात आलेली आहे.याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे राज्यातील सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० %सवलत मिळणेबाबत राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना निर्देशीत करण्यात आलेले आहे.त्यानुसार आजपासून महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी,मिडी/मिनी,निमआराम,विनावातानुकूलित शयन आसनी,शिवशाही(आसनी),शिवनेरी(साधी व वातानुकूलित) व इतर बस भाड्यामध्ये ५० % सवलत लागू करण्यात येत आहे.त्याचबरोबर सदरील सवलत हि भविष्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरिता लागू करण्यात येईल.सदर योजनेला महाराष्ट्र सरकारच्या वतीने “महिला सन्मान योजना”म्हणून नाव देण्यात आलेले आहे.या योजनेअंतर्गत महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंतच लाभ मिळणार आहे मात्र सदरील सवलत हि शहर बस वाहतुकीपासून वगळण्यात आलेली आहे त्यामुळे शहर वाहतुकीचा लाभ घेता येणार नाही.सर्व महिलांना पावस भाड्यात ५० टक्के सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेद्वारे,विंडो बुकिंगद्वारे,ऑनलाईन,मोबाईल ऍपद्वारे,संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात येईल.यात ७५ वर्षांवरील महिलांसाठी “अमृत जेष्ठ नागरिक”योजनेच्या परिपत्रकीय सूचनेनुसार १०० टक्के सवलत,६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना “महिला सन्मान योजना” नुसार ५० टक्के व ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापूर्वीप्रमाणेच ५० टक्के सवलत मिळणार आहे.याबाबतची कार्यवाही करणेबाबत संबंधित विभागीय नियंत्रक यांना शासनाचे वतीने परिपत्रकांव्ये सूचित करण्यात आलेले आहे.