यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील मनवेल येथे गावातील प्रभाग क्रमांक एकमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रखडून असलेली विजेची समस्या सुटल्याने वार्डात विजेच्या लखलखाटाणे रहिवाश्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
तालुक्यातील मनवेल येथील थोरगव्हाण रस्त्यालगत गावाच्या पूर्वेस असलेल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये विजेचे पोल नसल्यामुळे येथील रहिवाशी गेल्या कित्येक दिवसांपासून त्रस्त होते.त्यात वार्डात पथदिवे नसल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते.येथील ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई सुधाकर पाटील यांचे पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ता महेंद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य नरहर भिल्ल,कमलबाई भिल्ल यांनी सरपंच जयसिंग सोनवणे व उपसरपंच मिनाश्री पाटील,ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने येथील विज वितरण कंपणीचे कनिष्ट अभियंता निलेश महाजन,दिनकर माळी व मनवेल येथील लाईमन असलम तडवी यांच्याकडे या वार्डातील विजेच्या खांब उभा करुन नागरीकांची समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला व विजेचे दोन खांब उभे करुन पथदिवे प्रत्यक्षात सुरु झाल्यामुळे येथील रहिवाश्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या या कार्याचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले आहे.यापुर्वी येथील वार्डमध्ये रस्ता,गटारी व विजेची समस्या सोडविण्यास यश आले असून येथील गावातील थोरगव्हाण रस्त्यावर असलेल्या प्रमुख मार्गावरील रस्त्याच्या गटारीची समस्या अद्याप प्रलंबीत आहे.सदरील समस्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करुन मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील असल्याचे मनवेल ग्रामपंचायतीच्या सदस्या सुंनदाबाई पाटील यांनी माहीती म्हटले आहे.