यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील एका अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात ईसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,किनगाव तालुका यावल येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई वडीला बरोबर राहुन गावात भांडी धुणे व आदी घरकाम करते.आज दि.१७ मार्च रोजी ती सकाळी ९ वाजेच्या सुमारास गावात चौधरी यांच्याकडे घरकामासाठी गेली असता चौधरी यांच्या घरून सकाळी ९,४५ वाजता मुलीच्या घरी फोन आला की,तुमची मुलगी आज कामाला आलेली नाही..असा फोन आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वत्र नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी तिचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही.परिणामी कुणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवुन नेल्याची फिर्याद मुलगीच्या वडीलांनी यावल पोलिस ठाण्यात दाखल केल्याने यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रवींद्र पाटील करीत आहेत.