यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील यावल पुर्व वनपरिक्षेत्र विभागाच्या कार्यालयात वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन यावल,रावेर तालुक्यातील प्रादेशिक वनक्षेत्रातील सातपुडा पर्वतरांगांमधील जंगलातील झाडांची चोरटी वृक्षतोड,अवैध अतिक्रमण व वनवणवा रोखण्यासाठी तसेच लागलेला वनवा विझविण्यासाठी वन विभागाच्या वतीने वरिष्ठ पातळीवर प्लॅन बनविण्यात आला असून याकरीता या निगराणीकरिता ९० वन मजुरांचे पथके तयार करण्यात आले आहे.यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्वाची बैठक दि.१८ मार्च शनिवार रोजी घेण्यात आली.त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपयोजनांबाबत रूपरेषा ठरविण्यात आली.
बैठकीत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदरील वनमजुरांचे पथक हे सातपुडा वनविभागातील कार्यक्षेत्रातील मौजे मनुदेवी,वाघझिरा,आंबापाणी, निंबादेवी,नागादेवी,जामुनझिरा,हरिपुरा,आसराबारी,चारमळी,रुईखेडा,मोहमांडली,तिड्या,अंधारमळी,डोंगरदे,जानोरी,निमड्या,गारखेडा,पाल, गारबर्डी,मोहरव्हाल,जिन्सी,पाडल्या बु,लालमाती,सहस्रलिंग,कुसुंबा,लोहरा,चिचाटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नियमित जंगल गस्ती कामी तैनात करण्यात आलेले आहे.यात जंगलात आग लावणारे गुन्हेगार पकडणारे,शोधुन आणणारे,त्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्ति यांना वनविभागाच्या वतीने १००००/-( दहा हजार) रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून सदरील इनाम गुपीत पद्धतीने दिला जाणार आहे.तसेच वन वणव्यामुळे जंगलाचे मोठे नुकसान होत असल्याने जंगलात व जंगलाचे शेजारी राहत असलेले सर्व जनतेने जंगलात आग लावू नये,आग लागलेली दिसल्यास व आगीची माहिती मिळाल्यास तात्काळ वन कर्मचारी यांना कळवावे अथवा टोल फ्री क्रमांक१९२६ वर संपर्क साधावा तसेच वनवा विझविण्यासाठी वन कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.त्याचबरोबर जंगलात आग लावण्याचे प्रकार थांबले नाही तर जंगलांचे होणारे नुकसान पहाता जंगलातून डिंक,इतर वनोपज गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींना दिलेले परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी दिला आहे. वनरक्षणासाठी तसेच वृक्षाची तोड करू पाहणाऱ्या वनगुन्हेगारांची कुठल्याही परिस्थितीत हयगय केली जाणार नाही व त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावल येथील पुर्व वन विभागाच्या कार्यालयातील सभागृहात सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमात वन कर्मचारी यांना वन विभागाचे टी शर्ट,पॅन्ट, टोपी,शुज,पाणी बोटल अशा साहित्यांचे वाटप करण्यात आले.सदरील कार्यक्रम डिगंबर पगार वनसंरक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.या कार्यक्रमात जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव,प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल,विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व,सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम,अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर,रविंद्र तायडे वनपाल डोंगरकठोरा,वनरक्षक प्रकाश बारेला,भैय्यासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले तर आभार सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम यांनी मानले.