Just another WordPress site

पाडळसा सह तालुक्यात अवैध वृक्षतोड प्रमाणात वाढ

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील पाडळसे,पिळोदा बु.,कोजगाव,वनोली,रिधुरी,दुसखेडा,डोंगर कठोरा,सांगवी,हिंगोणा सह तालुक्यातील परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने दररोज शेकडो लिंबाच्या झाडांसह इतर झाडांची दिवसाढवळ्या राजरोसपणे वृक्षतोड केली जात आहे.याकडे वनविभागासह सर्वच शासकिय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,पाडळसे परिसरासह तालुक्यात दररोज अवैद्य वृक्षतोड करण्यासाठी यावल,फैजपूर तसेच मारुळ गावातून दररोज अत्याधुनिक मशीनसह घेऊन रिक्षामधून माणसे आणली जातात.यात काही शेतकरी आपल्या शेतातील बांधावरील कडूलिंब अल्पदरात पाडळसेसह तालुक्यातील अवैद्य वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात.सदरील शेतकऱ्यांचा फायदा घेऊन हे व्यापारी अवैद्य वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.सदरील अवैद्य लिंबाची लाकडे तोडून चारचाकी वाहनाने परिसरातील विटभट्या व भुसावळ एमआयडिसी तसेच व्यापारी यांच्या सोईच्या ठिकाणी हि लाकडे जाळण्यासाठी वाहतुक करण्यात येते आहे.यात पाडळसे पिळोदा रस्ता (मनुदेवी रस्ता) ह्या वृक्ष तोडणाऱ्या व्यापाऱ्याने पाडळसे पिळोदा या गावातील प्रतिष्ठित लोकांना रंगीत पार्टी दिल्याची परिसरात चर्चा आहे. शासन दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा हा नारा देऊन दरवर्षी कोट्यावधीचा खर्च केला जातो आणि इकडे मात्र अवैध वृक्ष तोडणाऱ्यावर कार्यवाही होत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून संबंधित वनविभाग अधिकाऱ्यांनी तूर्त लक्ष पुरवून अवैद्य वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात येऊन अवैद्य वृक्षतोडीमुळे जंगलांचा होणारा नाश थांबवावा अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.