रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी पुन्हा सहा संशयित ताब्यात
आणखी संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता ?
रावेर-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- संपुर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी पुन्हा सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे परिणामी आणखी संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता वाढली आहे.
रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी अटक सत्र चालू असतांना नव्याने सहा जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यात अरबाज फिरोज खान(वय २१)लुमखेडा,कामिल जमील खान (वय ३५)लुमखेडा,फिरोज जमील खान(वय ४०)लुमखेडा,शेख आरिफ शेख रईस (वय २९)ऊदळी,आदम जहाँनखा तडवी (वय ३७)कुसुम्बा खु!!,रमेश सुभान तडवी (वय४०)कुसुम्बा खु!! अशा सहा जणांना नव्याने संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.याबाबत शौचालय घोटाळ्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.