यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील आश्रय फाऊंडेशनच्या वतीने फैजपूर शहरात विविध क्षेत्रात सामाजिक व विधायक तसेच विधायक कार्य करणाऱ्या कतृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्याचे नुकतेच मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.फैजपुर शहरातील शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या परिसरात जागतिक महिला दिन सेवा पंधरवाडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळा कार्यक्रमात यावल-रावेर तालुक्यातील विविध क्षेत्रात सामाजीक व विधायक कार्य करणाऱ्या १५ महिला व तीन महिला मंडळाचा सन्मान यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका शुभांगी महाजन या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,उपाध्यक्ष डॉ.विलास पाटील,सचिव डॉ.पराग पाटील,डॉ.राजेश चौधरी,डॉ.दिलीप भटकर,डॉ.नितीन महाजन,डॉ.भरत महाजन,डॉ.प्रशांत जावळे,डॉ.ताराचंद सावळे,डॉ.निलेश पाटील,डॉ.शैलेश खाचणे,डॉ.सोहन महाजन,डॉ.नितीन महाजन हे उपस्थित होते.सदरील कार्यक्रमात यावल-रावेर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात कौटुंबिक जबाबदारी अत्यंत सचोटीने पार पाडत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा कार्यगौरव करीत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजात वावरणाऱ्या गरजूना आपली मदत व्हावी यासाठी सदैव धडपड करणाऱ्या महिलांना आपल्या कार्यात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महिलांचा सत्कार करण्यात आला.दैनंदिन जीवनात होत असलेली धडपड विसरून समाजकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या महिलांचे कार्य खरोखर मोलाचे असल्याचे मान्यवरांनी आपल्या विचारातुन व्यक्त केले.कार्यक्रमांचे प्रस्ताविक आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी तर सूत्रसंचालन फैजपूर येथील शिक्षिका अश्विनी कोळी यांनी केले.
या कार्यक्रमात जयश्री प्रदीप पाटील,रुबीना हसन तडवी,प्रिया विश्वास कुवर,धनश्री शिरीष पाटील,वैशाली विलास ताठे,किरण विवेक महाजनी,चंद्रनी अमित समर्थ,जयश्री अनिल पाटील,जयश्री हर्षल बोन्डे,सरला जाहऱ्या बारेला,डॉ.जागृती फेगडे,डॉ स्नेहल जावळे,डॉ.भाग्यश्री महाजन,डॉ.शीतल पाटील,डॉ.सोनम खाचणे,डॉ.संगीता महाजन,सौं.धनश्री भटकर,डॉ.प्रीती सावळे,डॉ.वृषाली पाटील,सविता सारिचंद जाधव,तेजन्विनी अजय बढे,हिरकरी विकास पाटील,वंदना रवींद्र महाजन,वैशाली सिद्धार्थ मेढे,गजाला तबस्सुम कमालोध्दीन या महिलांची प्रमुख उपस्थिती राहिली.प्रसंगी योगा प्रशिक्षक स्वाती माधव गवई,महिला उद्योजिका प्रतिभा अरुण पाटील,नलिनी चौधरी फैजपूर,वैशाली किशोर सरोदे न्हावी,शालिनी युवराज कोलते न्हावी, होमगार्ड सुलभा चंद्रकांत तळेले,देवका नरेंद्र पाटील न्हावी,शुभांगी अरुण महाजन,आशालता लीलाधर राणे,अश्विनी योगेश कोळी या महिलांचा तसेच हरी कृष्णा सत्संगी महिला ग्रुप फैजपूर,युवा क्रांती पोलीस मित्र ग्रुप फैजपूर,भक्ती महिला मंडळ फैजपूर या तीन महिला मंडळांचा सन्मान करण्यात आला.