Just another WordPress site

यावल येथे शासनाच्या किमान आधारभुत किमतीत हरभरा खरेदीस आजपासून शुभारंभ

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील शेतकरी बांधवांकरिता केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने चना( हरभरा) हंगाम २०२२-२०२३ खरेदी केंद्र यावल येथे आज साध्या पद्धतीने शेतकरी बांधवाच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्य गोदाम या ठीकाणी आज दि.२० मार्च २३ सोमवार रोजी सकाळी १० वाजता तालुक्यातील कोरपावली येथील प्रथम शेतकरी नाना यादव महाजन यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पुजन करुन शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती तथा कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे,बाजार समीती सचिव स्वप्नील सोनवणे,वि.का.सोसायटीचे संचालक ललीत महाजन,महेंद्र नेहेते,मिलिंद महाजन,इम्रान पटेल,सर्व संचालक मंडळ तसेच सोसायटीचे सचीव मुकुंदा तायडे व कोरपावली ग्राम पंचायत सदस्य अफरोज पटेल व परिसरातील शेतकरी बांधव याप्रसंगी मोठया संख्येने  उपस्थित होते.यावेळी शासना कडून किमान आधारभुत किमती खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढ मिळाल्यानंतर आजपासून सदरील हरभरा खरेदीची सुरुवात करण्यात आली आहे.यात तालुक्यातुन एकूण ७७५ शेतकऱ्यांनी आपल्या नावांची नोंदणी केलेली असून तालुक्यातील जास्त जास्त शेतकऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत आपल्या हरभरा विक्रीची नोंदणी करून शासन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.