यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर कट्टा विभागातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे या होत्या.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.एस.पी. कापडे यांनी करिअर कट्टा विभागाची उद्दिष्टे याबाबत माहिती दिली.स्पर्धा परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक जळगाव येथील युनिक अकॅडमीचे बॅच प्रमुख विकास गिरासे यांनी एम.पी.एस.सी,यू.पी.एस.सी.ची पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा तसेच मौखिक परीक्षा पेपर पात्रता वय,मार्क्स पासिंग, कॅटेगिरी,नवीन पॅटर्नची सविस्तर माहिती तसेच चालू घडामोडी,निर्णय क्षमता,ऑनलाइन एज्युकेशन,तत्त्वज्ञान,केस स्टडी,मुलींचा सहभाग,मॉक टेस्ट,संदर्भ ग्रंथ,प्रॅक्टिस,प्लॅनिंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातत्य या विषयी त्यांनी महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाव्दारे माहिती दिली.युनिक अकॅडमीचे समन्वयक नरेंद्र पाटील यांचीही कार्यक्रमास उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धेचे युग आहे.याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवावे स्वतःचे आत्मपरीक्षण करून तयारी करावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील,प्रा.एम.डी.खैरनार,डॉ.पी.व्ही.पावरा,डॉ.निर्मला पवार,डॉ.कोष्टी,प्रा.भारती सोनवणे,प्रा.संतोष जाधव, प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.मयूर सोनवणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.