यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “चिमणी दिवस” नुकताच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या साजरा करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये उष्णतेची लाट कमालीची वाढलेली असते अशात उन्हाळ्यात पक्षांना पाणी व अन्नासाठी जास्तीची भटकंती करावी लागते.यात पाणी किंवा अन्न न मिळाल्यास अनेक पक्षांचे हाल होत असतात तर काही वेळेस पक्षांना मृत्यूलाही कवटाळावे लागते.पक्षी वातावरण व निसर्ग यांचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतात.अशा या पक्षांकरिता आपल्याला काय करता येईल ?तसेच पक्षांना कृत्रिम घरटे तसेच पाणी व अन्नाची व्यवस्था करण्यासाठी प्लास्टिक बॉटल व इतर टाकाऊ वस्तूपासून घरटे तयार करून मूठभर धान्य संकलीत करून पक्षांसाठी भूतदया दाखवता येईल अशी संकल्पना प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.आर.एस.तडवी व प्रा.मयूर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली आणि काय आश्चर्य या संकल्पनेला विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात भरभरून पाठिंबा मिळाला परिणामी विदयार्थ्यांनी पाण्याची व धान्याची व्यवस्था करून महाविद्यालय परिसरात,बागेत व विविध ठिकाणी पक्षांकरिता पाण्याची व धान्याची व्यवस्था करून महाविद्यालय परिसरात किलबिल शाळा फुलविण्यास हातभार लावला.विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या भुतदयेबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाला उधाण आल्याचे दिसून आले.यात प्रीती निळे,कोमल खलसे,मयुरी खंबायत,भावना बारी,पूजा पाटील,दिव्या निळे,दिपक कोळी, अनिकेत पवार आदींचे सहकार्य लाभले.या चिमणी दिवस कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील,प्रा.एम.डी.खैरनार, डॉ.एस.पी.कापडे,डॉं.एच.जी.भंगाळे,डॉ.आर.डी.पवार,डॉ.पी.व्ही.पावरा यांचे मार्गदर्शन लाभले.