Just another WordPress site

मनवेल विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुक चौथ्यांदा बिनविरोध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत १३ जागा अखेर बिनविरोध झाल्या आहेत.
थोरगव्हाण,पथराडे,दगडी,पिळोदा खुर्द,व मनवेल या पाच गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १३ जागांकरीता होणाऱ्या निवडणुकीदरम्यान याधीच तीन जागा या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या उर्वरित १० जागांकरीता १५ अर्ज शिल्लक होते त्यात अखेर ५ उमेदवारांनी माघार घेतल्याने पूर्ण १३ जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत.त्यामुळे मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक हि चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे.

मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गेल्या आठ ते दहा वर्षापासून सतत तोट्यामध्ये असुन या निवडणुकीसाठी होणारा खर्च वाचावा म्हणून तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्याने यावेळी सुध्दा संस्थेचा खर्च व्यर्थ जाऊ नये म्हणून थोरगव्हाण येथील भरत धनसिंग चौधरी यांनी सर्व आजी,माजी चेअरमन,सचांलक व सभासद यांच्याशी सोसायटी हिताच्या दृष्टीकोणातुन चर्चा करुन तेरा जागा निवडणुक न लढवता बिनविरोध निवडुन आणण्याबाबत एकवाक्यता करण्यात आली व त्यानुसार सर्व चित्र ठरल्याप्रमाणे झाले त्यामुळे संस्थेचा खर्च पण वाचला परिणामी निवडणूकही बिनविरोध झाली.भरत चौधरी यांनी केलेल्या सहकार हिताच्या दृष्टीने मध्यस्थी करून घेतलेल्या निर्णयाचे परिसरात कौतुक करण्यात केले जात आहे.या बिनविरोध निवडणुकीत सर्व साधारण आठ जागेतुन युवराज संतोष पाटील (थोरगव्हाण),गयभू रामदास चौधरी (थोरगव्हाण),विनोद श्रावण पाटील (थोरगव्हाण ),कांतीलाल मोतीलाल पाटील (पिळोदा खुर्द),धर्मराज हिरामण पाटील (पिळोदा खुर्द ),हुकूमचंद मंगलसिंग पाटील (मनवेल),वासुदेव सिताराम पाटील (मनवेल ),काशिनाथ पाटील (मनवेल),इतर मागासवर्गीय जागेतुन भरत धनसिंग चौधरी (थोरगव्हाण) महिला राखीव दोन जागेतुन योगिता दिपक पाटील (मनवेल),शानुबाई भागवत पाटील तर वि.जा.भ.जा.विमाज जागेतुन पथराडे येथील हरी तुकाराम धिवर अशा तेरा जागा बिनविरोध निवडुन आल्या आहे.या संपुर्ण निवडणुक प्रक्रीयेत निर्णय अधिकारी म्हणून के.व्हि.पाटील यांनी काम पाहिले तर त्यांना संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे,क्लार्क सुकदेव पाटील यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.