यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील वनविभागाच्या वतीने २१ मार्च जागतिक वनदिनानिमित्ताने विविध वृक्षांच्या लागवडीसह पशु व पक्षांना बुस्टर भांडे बसवून तसेच पशुपक्षांना दाणा,चारा व पाणी यांची उपलब्धता करून देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
२१ मार्च जागतीक वन दिन दृष्टीआड असलेल्या मानवाला वृक्षलागवड व वृक्षतोडीबाबत न समजण्याचे उदारण म्हणजे शुध्द हवा,पिण्याचे पाणी व इतर बाबी मिळतात त्या म्हणजे जंगलांमुळेच.मात्र ऐशोआरामवादी जिवनशैलीसाठी बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवु लागले आहे व त्यामुळेच जंगल वाचविण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.अनावश्यक जंगलतोड टाळणे,अधिक झाडे लावणे तसेच जंगलाबाबत आस्था व जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलांबाबत चिंता वाटत असणाऱ्या निसर्ग व पर्यावरण प्रेमी अशांसाठी जागतिक पातळीवर व्यासपिठ मिळावे म्हणुन हा जागतीक वनदिन साजरा करण्यात येतो.यानिमित्ताने यावल वनविभाग कार्यालय परिसरात दि.२१ मार्च हा जागतिक वन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.या निमित्ताने यावल वन विभाग उपवनसंरक्षक जमीर शेख जळगाव व यावल सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालयात यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्या.विनोद डामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.तसेच परिसरातील पक्षांना दाणे खाण्यासाठी वृक्षांवर ब्रुस्टर भांडे लावून त्यामध्ये पक्षांना खाण्यासाठी ज्वारी,गहू,बाजरी,तांदूळ,हरभरा व इतर दाळी मिश्रण धान्य टाकण्यात आले त्याचबरोबर प्राण्यांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी भरून प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून जागतिक वन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रमात यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनपाल अतुल तायडे,रविंद्र तायडे,रज्जाक तडवी,ॲड.गोविंद बारी,ॲड.सावकारे,वनक्षक भैय्यासाहेब गायकवाड,सतिष वाघमारे,गोवर्धन डोंगरे,क्रिष्णा शेळके,निंबा पाटील,गणेश चौधरी,सुपडू सपकाळे,तुकाराम लवटे,प्रकाश बारेला,जिवन नागरगोजे,नंदलाल वंजारी,वनमजुर अनिल पाटील,अशोक माळी,पंढरी बारी यांच्यासह वनमजुर मोठया संख्येने उपस्थितीत होते.कार्यक्रमास यशस्वीतेकरिता यावल पुर्व विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.