यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-तालुक्यातील डोंगर कठोरा येथे सदगुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर, नाशिक व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित)यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१४ सप्टेंबर २२ बुधवार रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण डोंगर कठोरा येथील रहिवाशी राजु राणे यांच्या राहत्या घरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.असे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित)यावल यांनी कळविले आहे.
या शिबिरात हृदयविकार,मधुमेह,ब्लडप्रेशर,कावीळ,पोटाचे विकार,ऍनिमिया,संधिवात ,मनोविकार,मुतखडा,स्रियांचे आजार,त्वचा विकार,दंतविकार,गर्भाशयासह इतर सर्व प्रकारचे कॅन्सर,लहान मुलांचे आजार,मुळव्याध,जुनाट आजार,कंबर-पाठ-गुडघे दुखी या सर्व आजारांवर उपचार केले जाणार आहे.सदरील आजारांचे निदान श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील तज्ञ (डॉक्टर) वैद्य डॉ.नाना शेवाळे व डॉ.रौंदळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे.तरी गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित)यावल यांनी केले आहे.