Just another WordPress site

यावल येथे आसेम सिएससी ऑनलाईन सेंटरचे थाटात उद्दघाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

येथील नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील आसेम सिएससी ऑनलाईन सेंटरच्या कार्यालयात दि.२२ मार्च रोजी आसेम सिएससी ऑनलाईन सेंटरचे उद्दघाटन मोठ्या थाटात ट्रेझरी ऑफिसर नसीम तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मोटे हे होते.प्रसंगी ग्रामसेवक रूबाब तडवी यांना शासनाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच शब्बीर मुसा पटेल (ठाकुर) यांनी आपल्या जीवनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या दोघांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आसेमं संस्थापक अध्यक्ष राजु बिऱ्हाम तडवी,अनिल एन. तडवी,इरफान तडवी,रोशन हसन फैजपुर,सलीम फकीरा तडवी,सत्तारदादा तडवी दहिगांव,शरीफ आझाद तडवी,गफूर जनाब तडवी,सलीम तडवी एलआयसी,मुबारक तडवी गुरुजी,डॉ.लुकमान तडवी,फिरोज तडवी (पोस्टमास्टर),सलीम इस्माईल तडवी (पोलीस),दिलीप आप्पा तडवी,अश्रफ आप्पा तडवी,व्यंकटेश बारी (भाजप युवा),सागर पाठक,मुसा गुरूजी,कवी बि.राज तडवी,युसूफ शाह जळगाव,गणी शेख जळगाव,यासिन तडवी परसाडे,इरफान तडवी वेंडर बोरखेडा,सागर तडवी नायगाव,व्यवस्थापक अल्ताफ पटेल यांच्यासह आसेम पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसंगी आसेम संस्थापक अध्यक्ष राजु बिऱ्हाम तडवी यांनी यावेळी बोलतांना सांगितले की,पुढील महिन्यात जनसामान्य माणसाला शासकीय योजना तसेच इतर दाखले काढण्यासाठी मदत व्हावी याकरित फैजपूर,सावदा,रावेर या ठिकाणी आसेम ऑनलाईन सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.