Just another WordPress site

किनगाव चुंचाळे रस्त्यावर वृद्ध व्यक्तिचा गळा चिरून निर्घृण खून

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील किनगाव येथील एका वयोवृद्ध व्यक्तिचा अज्ञात व्यक्तिने धारधार हत्याराने निर्घृण खुन केल्याची घटना आज दि.२४ रोजी  समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी भिमराव शंकर सोनवणे वय ६० वर्ष वाहनचालक यांचा रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरडुन व नंतर दगडाने ठेचुन खुन केल्याची घटना नुकतीचसमोर आली आहे. चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली धारधार हत्याराने गळा कापुन दगडाने ठेचुन अत्यंत निर्घृण खुन झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली असुन या घटनेमुळे किनगाव व चुंचाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरील घटनेचे वृत्त कळताच फैजपुर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पहोचले असुन घटनास्थळी स्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे.मागील चार ते पाच महीन्याच्या कालावधीत अशा प्रकारे खून झाल्याची तालुक्यातील ही चौथी घटना आहे.या संदर्भात खुन झालेल्या व्यक्तिचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादी वरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदरील खून कुणी व कशासाठी झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.