यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राष्ट्रीय आरोग्य अभियांना अंतर्गत सिकलसेल किट व औषधी खरेदीत फार मोठा गोंधळ व भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी एका निवेदनाद्वारे तसेच सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.निवेदनात संबधीतांवर त्वरीत कार्यवाही न झाल्यास जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत रिपाई युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राजकुमार वानखेडे यांनी केलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय आरोग्य विभागा अंतर्गत सिकलसेल किट व औषधी जिएम पोर्टल वरून नुकतीच खरेदी करण्यात आली आहे परंतु या खरेदीमध्ये मोठा भ्रष्ठाचार झाल्याचे निर्देशनास आले आहे.या संदर्भातील पुरावे देखील निवेदनासोबत जोडण्यात आलेले आहेत.सिकलसेल विभागाचे संबधीत अधिकारी यांनी सिकलसेल चाचणीसाठी किट व औषधी खरेदीसाठी शासन निर्णयानुसार जिएम पोर्टल वरुन खरेदीचे आवेदन मागविले होते.त्या अनुषंगाने श्री ट्रेडर्स यांना बिल रेटप्रमाणे खरेदी करण्याचे आदेश आहे परंतु त्यात त्यांनी बाबोल्याबच्या किट पुरविण्यात येतील असे सांगीतले.याप्रमाणे मागणी करण्यात आलेल्या किट औषधीचा पुरवठा करून बिल देखील देण्यात आले आहेत परंतु याबाबत सत्य परिस्थितीनुसार जिएम पोर्टलला अधिकाऱ्यांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या श्री ट्रेडर्सच्या श्री नाईक नावाच्या इसमाशी संपर्क साधुन त्यांच्याकडून निविदा मागविली.यात युका डाइग्नोस्ट्रक नावाचे सिकलसेल किटवर स्पष्टपणे ५७५ रूपये किमत दाखविण्यात आलेली आहे परंतु त्यांनी दिलेले पत्र व निविदा कुणालाही दाखवण्यात आलेले नाही.परंतु अधिकारी व श्री ट्रेडर्स यांनी बायोल्याबच्या किटचे बिल युका डायग्नोस्टिक नावाच्या किटस देऊन शासनाची दिशाभुल व फसवणूक केलेली आहे.या बोगस किटची शासकीय नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्ता चाचणी करून जिल्ह्यात वाटपही करण्यात आलेले आहे हे विशेष !.संबंधित घोटाळ्यात बिल वेगळ्या कंपनीचे व माल वेगळयाच कंपनीचा तसेच किटची स्थानिक बाजार भावापेक्षा किंमत अधिक जास्त असा प्रकार झालेला आहे.त्याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे युका कंपनीच्या किटमध्ये सिकलसेल टेस्टींगसाठी लागणारे साहित्यच परिपुर्ण नसल्याचे दिसुन येत आहे.या आर्थिक घोटाळ्यात नाशिक येथील किट पुरवठाधारकाने नकार दिल्याने नागपूरच्या पुरवठा धारकाला किट मागाविण्याचे आदेश देण्याबाबत करण्यात आलेल्या खटाटोपाची माहिती पुराव्यांसह जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांना देण्यात आलेल्या निवेदनासोबत जोडलेली आहे.
तरी वरिष्ठ अधिकारी यांनी अशाप्रकारे आर्थिक मोहास बळी पडून जिल्ह्यातील शेकडो रुग्णांच्या आरोग्य व जिवाशी खेळ केला असून अशा घोटाळेबाजांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना शासकीय सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे.याबाबत तिन दिवसात गांर्भीयाने लक्ष देवुन ही कार्यवाही न झाल्यास रिपाई आठवले गट युवा विभागाच्या माध्यमातुन लोकशाहीच्या मार्गाने बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाई जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राजकुमार वानखेडे दिला आहे.