जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी)
यावल तालुक्यातील पाडळसा येथील तक्रारदार यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे.सदरहू फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे,वय-५२ वर्ष, पोलीस नामदार किरण अनिल चाटे,वय-४४ वर्ष व पोलीस नामदार महेश ईश्वर वंजारी,वय-३८ वर्ष, यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगाव यांच्याकडे केली होती.त्यानुसार सापळा रचून सहाय्यक फौजदार व दोन पोलीस नामदार अशा तीन जणांना चार हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभाग अधिकाऱ्यांना यश मिळाले आहे.परिणामी सदरील कारवाईमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील तक्रारदार यांच्याकडून फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे,वय-५२ वर्ष,पोलीस नामदार किरण अनिल चाटे,वय-४४ वर्ष व पोलीस नामदार महेश ईश्वर वंजारी,वय-३८ वर्ष यांनी पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/ रु.प्रमाणे लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदार यांनी पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.त्यानुसार श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,मा.श्री.एन.एस.न्याहळदे,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक.मा.श्री.नरेंद्र पवार,वाचक पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री.शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.जळगांव.सापळा व तपास अधिकारी एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि.जळगांव.यांच्या नियोजनातून दि.२४ रोजी सापळा रचण्यात आला.व या सापळ्यात वरील तिन्ही पोलीस कर्मचारी फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत चार हजार रुपयांची लाच घेतांना आढळून आले आहेत.या प्रकरणी या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या कारवाईमुळे लाच घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदरील कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,मा.श्री.एन.एस.न्याहळदे,अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक.मा.श्री.नरेंद्र पवार,वाचक पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक तसेच सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री.शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.जळगांव.सापळा व तपास अधिकारी एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि.जळगांव.यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यावेळी सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने,एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहिरे,पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर,पो.ना.जनार्दन चौधरी,पो.ना.किशोर महाजन,पो.ना.सुनिल वानखेडे,पो.ना.बाळु मराठे,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.सचिन चाटे,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांचे सहकार्य लाभले.तरी जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.अल्पबचत भवन,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,जळगांव दुरध्वनी क्र.०२५७-२२३५४७७ मोबा.क्र.८७६६४१२५२९ तसेच टोल फ्रि क्र.1064 यावर संपर्क साधावा असे आवाहन शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.जळगांव यांनी केले आहे.