यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी साठ वर्षीय ट्रकचालक वृद्धाचा काल दि.२४ रोजी अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता परिणामी सदरील खून प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी आपल्या तपासातील वेग कायम ठेवल्याने घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज दि.२५ रोजी संशयीत आरोपी म्हणुन वृद्धाच्या सुनेसह एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,तालुक्यातील किनगाव येथील भीमराव शंकर सोनवणे वय-६० वर्षे या वृद्धाचा मृतदेह किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली काल दि.२४ शुक्रवार रोजी छिन्नविछिन्न परिस्थितीत आढळून आला होता.याबाबत खुन झालेल्या व्यक्तिचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात खून झाल्याची फिर्याद दिली होती.याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र अधिक वेगाने फिरवून दुसऱ्याच दिवशी संशयित आरोपी शोधण्यात यश मिळविले आहे.त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,भीमराव सोनवणे या वृद्धाने आपल्या सुनेकडे शरीर सुखाची मागणी केली असता सुनेने ती नाकारली होती.या घटनेच्या रागातून सुनेने संशयित आरोपी जावेद शाह अली शाह वय २८ रा.वरणगाव तालुका भुसावळ ह.मु.उदळी तालुका रावेर याच्या मदतीने सासरे भिमराव सोनवणे यांचा धारदार हत्याराने निर्घृण खुन केल्याचे कारण प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवुन तात्काळ कारवाई करत याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.