यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी);-
महाराष्ट्र राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाने राज्यातील महीलांसाठी महिला सन्मान योजना अंतर्गत एसटी प्रवासात ५० टक्के सरसकट सवलत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.महिला प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसगाडयांची माहीती दिली जात असुन या कल्याणकारी योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.
याबाबत यावल एसटी आगार व्यवस्थापकांनी महिला प्रवासांना कोणत्या एसटी बस मध्ये ५० टक्के सवलतीचा प्रवास करता येईल याबाबतची माहिती देतांना गाडीचे वेळापत्रक व शेड्युलप्रमाणे बसचा प्रवास कसा असेल याची माहिती त्यांनी जाहीर केली असुन ती पुढीलप्रमाणे आहे.यावल बसस्थानकावरून सुटणाऱ्या गाडया यावल धुळे सकाळी ६ वाजता, यावल ते अकोला सकाळी ६:३० वाजता सुटेल,यावल बडोदा (गुजरात ) सकाळी ६:४० वाजता,यावल माहुरगड सकाळी ७:१५ वाजता,यावल ते बलसाड वापी( गुजरात )सकाळी ७:१५ वाजता,यावल बु्ऱ्हाणपुर सकाळी ७:३० वाजता,यावल ते पुणे सकाळी ७:३०,यावल जळगाव मार्गे लातुर सकाळी ८ वाजता,यावल ते पुणे,यावल उधना (गुजरात)सकाळी ८ वाजता,यावल कल्याण सकाळी ७: १५ वाजता,यावल जळगाव पुणे सकाळी ८ :२०वाजता,यावल ते छत्रपती संभाजी नगर सुटण्याची वेळ सकाळी १० वाजता,रावेर यावल धुळे सकाळी ११:३० वाजता,बुऱ्हाणपुर यावल शिर्डी दुपारी १२:३० वाजता,यावल धुळे बस वेळ दुपारी १ वाजता,यावल ते छत्रपती संभाजी नगर करीता दुपारी १:३० वाजता,यावल पिंपळनेर बस दुपारी १ वाजुन ४५ मिनिटांनी सुटेल,यावल ते चाळीसगाव ही बस दुपारी २वाजुन१५मिनिटांनी निघेल,यावल जळगाव मार्ग पुणे ही बस दुपारी ४वाजुन३०मिनिटांनी शेवटची बस असेल. प्रवासांचा आपल्या लाडक्या लालपरीचा वाढता प्रतिसाद बघता प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी प्रतिदिन यावल ते भुसावळ सकाळच्या ५ वाजेपासुन रात्रीच्या ९:३०पर्यंत दर अर्ध्या तासांने शटल बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.सदरील माहिती प्रवासांच्या हितासाठी देण्यात आली असून प्रवासांनी एसटी बसने सुरक्षीत व सुखाचा प्रवास करावा असे आवाहन यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.या सर्व प्रवासी बसेस वेळेवर सुटाव्यात याची आगार व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाची जबाबदारी यावल आगार वाहतुक निरिक्षक कुंदन वानखेडे,सिद्धार्थ सोनवणे,सहाय्यक वाहकतुक निरिक्षक के.ए.चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.