यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
संपुर्ण तालुक्याला हादरून सोडणाऱ्या किनगाव येथील ट्रकचालकाच्या झालेल्या निर्घृण खुनातील संशयीत दोघ आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातीत किनगाव बु येथील वयोवृद्ध ट्रकचालक भिमराव सोनवणे यांचा दिनांक २४ मार्चच्या रात्री किनगाव ते चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर झालेल्या खुनाबद्दल पोलीसांनी गावातील ग्रामपंचायतच्या वतीने विविध ठिकाणी लावण्यात आलेले सिसिटीव्ही (तिसरा डोळा)च्या मदतीने महत्वाची कामगीरी करीत खुनाचे आरोपींना अटक करण्यात मदत मिळाली आहे.मयत हा सुनेशी शरीर सुखाची वारंवार मागणी करीत असे अखेर या त्रासाला कंटाळुन झालेल्या वादातुन मयत भिमराव सोनवणे यांची सुन मिना सोनवणे हिने जावेद शाह जयअली शाह याच्या मदतीने सासऱ्याचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी दोघ संशयीत आरोपींना काल यावल न्यायालयात हजर केले असता न्या.एस.एम.बनचरे यांनी दोघ आरोपींना ३१ मार्चपर्यंत सात दिवसाकरीता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.या गुन्ह्यात अजून दुसरे आरोपी आहेत का?की या दोघांनीच सदरील वृद्धाचा खून केला आहे याबाबतची चाचपणी यावल पोलिसांच्या वतीने केली जात आहे.