यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघातर्फे दरवर्षी देण्यात येणारा “क्रीडा जीवन गौरव पुरस्कार” व जिल्हास्तरीय “आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार”नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर,कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे व सचिव राजेश जाधव यांनी सदरील पुरस्कार जाहीर केले आहेत.यात जिल्हाभरातून आलेल्या प्रस्तावाची छाननी समितीद्वारे करण्यात आली.या समितीचे अध्यक्षस्थानी जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक डॉ.पी.आर.चौधरी तर समिती सदस्य म्हणून प्राचार्य उत्तम चिंचाळे,मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील,मुख्याध्यापक विजय लोंढे,आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार्थी डॉ.रणजित पाटील व प्रा.हरिश शेळके यांचा समावेश होता.
सदरील क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रा.ईकबाल बेग उस्मानबेग मिर्झा जळगाव शहर,हरी गंगाराम काळे (का.ऊ.कोल्हे विद्यालय) जळगाव तालुका,सुरेश शंकर बारी (बारी समाज माध्यमिक विद्यालय शिरसोली)भुसावळ,आशिषकुमार प्रभाकर चौधरी (महात्मा गांधी विद्यालय,वरणगाव)वरणगाव,दिलीप बिहारी संगेले ( इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगाव)यावल,एकनाथ जगन्नाथ महाजन (सरदार जी.जी. हायस्कुल रावेर)रावेर,गणेश रमेश बोदडे (स्व.निखीलभाऊ खडसे विद्यालय मुक्ताईनगर) मुक्ताईनगर,गिरीष चंद्रराव पाटील (इंदिराबाई ललवाणी विद्यालय जामनेर)जामनेर,सुनिल कृष्णराव पाटील (माध्यमिक विद्यालय खाजोळा,पाचोरा),नितीन काशिनाथ सोनजे (सुमनताई गिरधर पाटील विद्यालय भडगाव),एरंडोल-सचिन रमेश महाजन (रे.ना.पाटील विद्यालय रिंगणगाव),चाळीसगाव योगेश रामराव साळुंखे (गिरणा माध्यमिक विद्यालय मेहुनबारे),पारोळा-रोहिणी गोविंदा जाधव (राणी लक्ष्मीबाई ज्युनियर कॉलेज पारोळा),अमळनेर-निवृत्ती लक्ष्मण पाटील (सरस्वती माध्यमिक विद्यालय सडावण),धरणगाव-मनोज दरियावसिंग परदेशी (पीआर हायस्कुल धरणगाव),चोपडा-जितेंद्र विजय महाजन (भाऊसो.शा.शि.पाटील विद्यालय चहार्डी),युवा गट-मेघशाम बळीराम शिंदे (सेंट अलॉयसिस हायस्कुल भुसावळ),
इंग्रजी माध्यम-छाया संदेशकुमार बोरसे (पोद्दार इंटरनॅशनल स्कुल जळगाव ),इंग्रजी माध्यम-विजय प्रभाकर विसपुते (उज्वल स्पराऊटर्स), ज्युनियर कॉलेज-प्रा.खुशाल भिकनराव देशमुख (के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव)यांची निवड करण्यात आली असुनसदर पुरस्काराचे वितरण लवकरच क्रिडाशिक्षक महासंघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येणार असल्याचे जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ सचिव राजेश जाधव यांनी सांगीतले आहे.
तर किनगाव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलचे क्रिडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले व पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुल चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,व्हा.चेअरमन शैलेजाताई विजयकुमार पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,व्यवस्थापक पुनम मनिष पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रिडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव,यावल तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक के.यु.पाटील व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.