धामणगाव बढे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.यात काँग्रेस प्रणित समता पॅनलने एकता पॅनलचा पराभव करीत विजय मिळविला आहे.
जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रविशंकर मोदे यांच्या नेतृत्वात समता पॅनल व शिवसेना तालुकाप्रमुख रामदास चौथंनकर यांच्या नेतृत्वात एकता परिवर्तन पॅनल यांच्यामध्ये लढत झाली.या निवडणुकीमध्ये समता पॅनलचे एकूण सात उमेदवार तर एकता परिवर्तन पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले.सदरील निवडणूक हि ११ जागांकरिता घेण्यात आली.यात तीन उमेदवाराच्या विरोधातील उमेदवारी अर्ज त्रुटीमुळे बाद करण्यात आले होते तर एका उमेदवाराच्या विरोधातील अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे त्या चार उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली होती.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेच्या वतीने जी.जे.आमले यांनी काम पाहिले.तर विजयी उमेदवारांच्या निवडीमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष अविनाश मोदे,वसंता घोंगडे,मगनसिंग नाईक,गफ्फार पटेल,आनंदा क्षीरसागर,नारायण हिवाळे,शेख नशीर शेख इमाम,कुमिदबाई गवळी,गजानन गोरे,अंजनाबाई गोरे,संगीताबाई शहाणे यांचे सहकार्य लाभले.