यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राकेश वसंत फेगडे यांनी आज दि.२९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक प्रक्रिया सुरू झाली असुन नामनिर्दशनपत्र दाखल करण्याची मुदत २७ मार्च ते ३ अप्रील २३ अशी आहे.आज दि.२९ मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती राकेश वसंत फेगडे यांनी सोसायटी मतदार संघातुन आपले नामनिदेशनपत्र निवडणुक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण यांच्याकडे दाखल केले आहे.यावेळी त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत,भाजपा यावल शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे यांच्यासह कोरपावली विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.कोरपावली तालुका यावल येथील रहिवासी राकेश वसंत फेगडे हे शेतकऱ्यांच्या हिताची जाण असणारे एक चांगले शेतकरी असुन त्यांनी कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन शेतकऱ्यांकरिता चांगले कार्य केले आहे तसेच सहकार क्षेत्राच्या आपल्या चांगल्या कार्याच्या बळावर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये याआधी चांगल्या प्रकारे उपसभापती पदाची जबाबदारी पार पडली आहे.