Just another WordPress site

अंकलेश्र्वर-बुऱ्हाणपूर खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकरिता रिपाईतर्फे निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर हा राज्य महामार्ग खड्डेमय झाला असुन दुरूस्तीसाठी रिपाई (आठवले गट)चे युवा जळगाव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी दि.२८ मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे उपअभियंता दिग्विजय पाटील (साईट इंजिनिअर) यांना निवेदन देऊन अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ मार्गी लावण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हे वाहनधारकांना समजेनासे झाले आहे परिणामी या मार्गावरून चालवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्याच बरोबर या महामार्गावर यावल ते चोपडा रस्त्याची अतिशय चिंता जनक अवस्था झाली असून सदरील अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर महामार्गाचे नुतनीकरण करण्यात यावे तसेच यावल ते चोपडा रस्ता सध्या शेवटची घटका मोजत असून त्या रस्त्यास जीवनदान म्हणून तात्पुरती डागडुजी करण्यात यावी जेणे करून जे अपघात घडत आहेत ते थांबतील.या समस्येकडे शाखा अभियंता जाणून बुजून दुर्लक्ष करत तर नाहीय ना?तसेच शाखा अभियंता आपल्या कार्यात निष्काळजीपणा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तरी संबंधित काम चुकार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी व त्यांचा मनमानी कारभार थांबवावा.तसेच सदरील महामार्गाचे नुतनीकरण एका महिन्यात सुरु करून यावल ते चोपडा रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यावी अन्यथा रिपाई (आठवले गटा )चे जिल्हा अध्यक्ष राजु सुर्यवंशी व युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारा देण्यात आला आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यावल येथील कार्यालयात नुकतेच निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी रिपाई (आठवले गट)चे युवा जिल्हा सचिव सुपडू संदानशिव व तालुका सदस्य किरण तायडे तसेच रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.