यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी कार्यक्रमा अंतर्गत प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधन व माहिती संकलन विषयावर व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील उपस्थित होते.यावेळी प्रमुख वक्ते प्रा.डॉ.संतोष जाधव यांनी इतिहास विषयावर संशोधन करतांना प्रथम वस्तुनिष्ट माहितीच्या आधारे तथ्य संकलन करणे आवश्यक असते. त्यासाठी संशोधन साहित्य,इतिहासाची साधणे,भाषावार प्रांतरचना,ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ,संशोधकांच्या मुलाखती याबाबत माहिती दिली.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी मार्गदर्शन करतांना इतिहास विषयाचे संशोधन हे सनावळीवर आधारलेले आहे त्यासाठी माहितीचे पुरावे लागतात यासाठी संशोधकामध्ये परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.गणेश जाधव यांनी केले तर आभार प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा.डॉ.आर.डी.पवार,प्रा.डॉ.हेमंत भंगाळे,प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.मनोज पाटील,प्रा.शेखर चव्हाण,प्रा.संजिव कदम उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता प्रा.सुभाष कामडी,मिलींद बोरघडे,रमेश साठे यांनी परिश्रम घेतले.