मिनाक्षी पांडव,पोलीस नायक
मुंबई विभाग प्रमुख
आगामी पुढील काळात शिंदे गटातील ४० आमदारांपैकी तब्बल २८ आमदार हे फुटून भाजपमध्ये प्रवेश करु शकतात !! असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नुकतेच केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन चर्चांना उधाण आले आहे.बेरोजगारी,महागाई व अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष विचलित करण्याकरीता राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र जनतेच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली असून सदरील जनता मतदान करण्याची संधी केव्हा मिळेल?याची आतुरतेने वाट पाहात आहेत.आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे कोणतेही नुकसान होणार नसून उलट शिंदे गटाचेच जास्त नुकसान होणार असून त्यांचे ४० पैकी २८ आमदार शिंदे गटाला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करू शकता असा दावा संजय राऊत यांच्याकडून केला जात आहे ते आज मुंबईत एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका करतांना म्हटले की,शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा आमच्या पक्षात आले तर आम्ही त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देणार नाही कारण तो कचरा गेलेला आहे.ज्या दळभद्री पद्धतीने त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली आहे ते पाहता त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाईल हि शास्वती नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारच्या नाकासमोर दंगल घडत आहे किंबहुना त्या नियोजनबद्ध रीतीने घडविल्या जात आहेत.संभाजीनगरचे नामांतर अत्यंत शांततेत झाले त्यावेळी कुठलीही दंगल झाली नाही.यावेळी काही जणांनी विरोध केला पण तोही लोकशाही मार्गाने केला होता मग कालच दंगल का झाली?राज्यातील जनतेसमोर सध्या शिक्षण,महागाई,आरोग्य,करोनाची साथ पुन्हा येण्याची शक्यता हे प्रश्न आहेत त्यामुळे दंगली घडवून हे प्रश्न सुटणार नाहीत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.