यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केन्द्रातील मोदी सरकारने केलेल्या सुडबुद्धीच्या कार्यवाहीचा निषेध नोंदविण्यासाठी यावल येथील तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येवुन देशात सुरू असलेल्या हुकुमशाही सरकारचा नुकताच निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी यावल येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात काँग्रेसचे जेष्ठ माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी काँग्रेस कमेटी यावल क्षेत्राचे निरिक्षक ज्ञानेश्र्वर महाजन,तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे,यावल पंचायत समिती माजी गट नेते शेखर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नितिन व्यंकट चौधरी, भगतसिंग पाटील,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड,तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,शहराध्यक्ष कदीर खान,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,पुंडलीक बारी,नावऱ्याचे माजी सरपंच समाधान पाटील आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस पक्षाची भुमिका व सद्यस्थितीला देशाची परिस्थिती या विषयावर उपस्थितांनी आपले विचार व पक्षाची भुमिका मांडली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ७ फेबुवारीला संसदेत गौतम अडानी यांच्या घोटाळ्या संदर्भात सरकारकडे प्रश्न विचारले.यात अडानी समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रुपये कोणाचे?नरेन्द्र मोदी आणी गौतम अडानी यांचा संबध काय? विमानतळ,संरक्षण क्षेत्र,उर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अडानी कशी मदत केली?असे अनेक गंभीर प्रश्नांचे उत्तर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारल्याने देशातील मोदी सरकार कडून राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले असून त्यावर राहुल गांधी यांनी बोलण्याची तयारी दाखली मात्र त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नाही.गौतम अडानीच्या चक्रव्युहात फसलेल्या मोदी सरकारचा घोटाळा प्रकरण बाहेर येईल या विषयाला घाबरून राहुल गांधी यांच्यावर गुजरातच्या कोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल करून मानहानीच्या प्रकरणात सुडबुध्दीने कार्यवाही करीत दोन वर्षाची शिक्षा सुनावली व त्यांची खासदारकी रद्द करण्याचे षडयंत्र रचण्यात आलेले आहे अशा या मोदीच्या नेतृत्वाखालील सरकारचा जाहीर निषेध या पत्रकार परिषदेत नोंदविण्यात आला.