यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील विरोदा येथील तलाठी कार्यालयाच्या ठीकाणी (मुख्यालयी) उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांना आपल्या विविध शासकीय कामा निमित्त लागणारे दाखले व आदी कामासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांच्या वतीने यावल निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की,विरोदा येथील तलाठी हेमा सांगोळे या नेमणुकीच्या ठीकाणी राहत नसल्याने गाव व परिसरातील ग्रामस्थांना शासकीय कामास लागणारे विविध दाखले,उतारे घेण्यासाठी फिरावे लागत आहे त्याचबरोबर शेतीच्या ई पीक पाहणीची माहिती शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पीक नोंदणी करतांना अडचणी निर्माण होत आहेत.तसेच विरोदा या क्षेत्रातुन मोठया प्रमाणावर गौण खनिजची अवैध वाहतुक करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच विरोदा येथील तलाठी हेमा सांगोळे हे आपल्या कर्तव्यात कसूर करतांना दिसत आहेत त्यामुळे यांच्या विरूद्ध या तक्रारी वाढत असुन देखील संबधित तलाठी व अधिकाऱ्यांचे काही साठे लोटे आहेत का? असा प्रश्न निर्माण होत असून शेतकरी बांधवांना योग्यवेळी सहकार्य न करणाऱ्या तलाठी यांच्या विरोधात लवकरच तहसील कार्यालय यावल येथे रिपाई जिल्हा युनिटच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी त्यांच्यासोबत रिपाई सदस्य किरण तायडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.