नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर दि.३ ऑक्टोबर २२ रोजी येथील सुरेश भट सभागृहात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या बौद्ध परिषदेला देश विदेशातील दोन हजाराहून जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहे व याच आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक व माजी कुलसचिव डॉ.पुरणचंद्र मेश्राम यांनी नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.या पत्रकार परिषदेला नितीन गजभिये,प्रा.वंदना इंगळे,प्रा.प्रवीण कांबळे,डॉ.नीरज बोधी,प्रकाश कुंभे आदी उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन थायलंडच्या चेरनत्वन आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटरचे प्रमुख भदंत फ्रा मेधीमज्जीरोदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यात थायलंडचे डॉ.पोंगसांक टंगकाना हे बीजभाषण करतील.या परिषदेला वर्ल्ड अलायन्स बुध्दिस्टचे अध्यक्ष भदंत पोर्नचाईपिन्यापोंगे,भदंत महा आर्यन,मास्टर मिचेल ली(जर्मनी),कॅप्टन नट्टाकिट,टीथीरड हेंगसाकूल,पटचारपिमोल,उषा खोराना,उटीचाई वोरासिंग,मिथिला चौधरी(थायलंड),डॉ.थीम क्वांग(जर्मनी),डॉ.सुखदेव थोरात,भन्ते विमलकीर्ती गुणसीरी,डॉ.यशवंत मनोहर,प्रा.जोगेंद्र कवाडे सर,डॉ.रूपाताई बोधी,डॉ.विमल थोरात आदी मार्गदर्शन करणार आहेत.तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,ऍड.सुलेखा कुंभारे,सिद्धार्थ हत्तीमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल.