Just another WordPress site

यावल महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार विषयावर मार्गदर्शन‌‌

यावल-पोलीस नायक(प्रतिIनिधी):-

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागा मार्फत प्राचार्या‌.डॉ‌.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन आर‌.ए.पाटील,प्रशांत महाजन हे उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे व्याख्याते दिगंबर कटारे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर मार्गदर्शन करतांना निरीक्षण,परीक्षण,चिकित्सा ही वैज्ञानिकदृष्टिकोनाची पायरी आहे‌.कार्यकरण भाव ही दृष्टिकोनाची सोपी पध्दत असून हातचलाखी,अंगातील पेहराव व रसायणे वापरुन जादुचे प्रयोग दाखवून मोठ्या प्रमाणात श्रध्दा,अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाचे आतापर्यंत शोषण होत दिशाभुल व फसवणुक केली जात आहे त्याबाबत सावधानता बाळगायला हवी असे आवाहन त्यांनी केले‌.प्रा‌.दिलीप भारंबे यांनी प्रयोगशील मार्गदर्शन करतांना सर्फेटेशन,पृष्टियता,बरजॉलिझ,प्रिन्सिपल,मध्यबिंदू,केंद्रगामी,उदगामी,ऑप्टिकल फायबर,ऍग्लर मुमेंटम ह्या विज्ञानातील भौतिक शास्त्रातील घटकांवर प्रयोग करुन महत्व विशद केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा‌.प्राचार्य‌.डॉ.संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे ही उपजत कला असून सध्याच्या युगात विद्यार्थांनी पुस्तकीज्ञानाबरोबर वैज्ञानिक घटकांचाही अभ्यास केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्ताहर शेखर पटेल यांनी केले‌.सूत्रसंचालन उपप्राचार्य अर्जुन पाटील यांनी तर आभार प्रा‌.संजय पाटील यांनी मानले‌‌.कार्यक्रमाला प्रा‌‌.डॉ‌‌.एस.पी.कापडे,प्रा‌.डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.मनोज पाटील, प्रा‌.एकनाथ सावकारे,प्रा.अरुण सोनवणे,प्रा‌.संजिव कदम,प्रा.डॉ‌.संतोष जाधव,प्रा.डॉ.निर्मला पवार,प्रा.भारती सोनवणे,प्रा‌.सुभाष कामडी,प्रा मिलींद मोरे,प्रा‌.नरेंद्र पाटील,प्रा.गणेश जाधव,अमृत पाटील,मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,प्रमोद कदम यांच्यासह विद्यार्थी विद्यर्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.