Just another WordPress site

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक छाननीमध्ये तीन काँग्रेस उमेदवारांचे अर्ज अवैद्य

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

संपुर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या १८ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या १४४ उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी केली असता ३ उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत.

त्यात विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अट्रावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन व्यकंट चौधरी, किनगावचे यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील व न्हावी येथील तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक ग्रामपंचायत मतदार संघातून सुनिल फिरके यांचा एक अर्ज असे एकूण तीन अर्ज अवैध झाले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतुन या तिन काँग्रेसच्या मातब्बर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने राजकीय वर्तृळात एकच चर्चेचा विषय बनला आहे.आता यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची संख्या १४१ इतकी राहिली आहे.दि.२० एप्रील रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा घेण्याचा दिवस असुन दि.२१ एप्रील रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतीम यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे तर दि.३० एप्रिल रविवार रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकी संदर्भातील माहिती यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एम.चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.