यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथील तहसील कार्यालयास गुरुवार रोजी भेट देऊन तालुक्यातील सर्व शासकीय विभागाची आढावा बैठक घेतली.याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग,वनविभाग,नगरपालिका,पंचायत समिती,कृषी विभाग,पोलीस प्रशासन विभागाचे सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
यावेळी विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत अडीअडचणी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी यावल पोलीस स्टेशनला भेट देवुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबणानंतर अट्रावल गावच्या सद्य परिस्थिती व दंगलीची सविस्तर माहीती जाणुन घेतली.सदर बैठकीस उपविभागीय अधिकारी कैलास कडलग,उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजित निंबाळकर,वनविभागाचे विक्रम पदमोर,यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पी.बी.देसले,महीला व बालविकास प्रकल्पच्या अर्चना आटोळे यांचे सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी महिला बचत गटाच्या नाश्ता व भोजन केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
येथील भुसावळ रस्त्यावरील दूरध्वनी कार्यालयाजवळील पेट्रॉलपंपाच्या शेजारी आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या न्यूक्लिअस योजनेअंतर्गत आदिवासी महिलांच्या बचत गटाला खादय ढाबासाठी ८५ टक्के अनुदान योजनेला आयुक्त नयना गुडे व अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडुन मान्यता मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्वातील यावल चोपडा व रावेर या ठीकाणच्या खाद्य ढाब्यांना मान्यता मिळाली आहे त्यानुसार यावल तालुक्यातुन या योजनेची सुरूवात करण्यात आली आहे.येथे एकलव्य आदिवासी महिला बचत गटाच्या नाश्ता भोजनालय केन्द्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.या प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलक,तहसीलदार महेश पवार,आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्युक्लिअस बजेट योजनेचे सहाय्यक पवनकुमार पाटील,सहाय्यक प्रकल्प अधिकारी जे.आय.तडवी,सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे,सहाय्यक लेखा अधिकारी पी.व्ही.रोकडे यांच्यासह एकलव्य आदीवासी महिला बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.