Just another WordPress site

अमरावती येथे खा.नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामूहिक हनुमान चालीसा पठण

"उद्धव ठाकरे,तुम किस खेत की मुली हो"असे म्हणत खा.नवनीत राणा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका

गोपाल शर्मा ,पोलीस नायक

अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-

अमरावती बडनेरा रोडवरील हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे दि.६ रोजी खासदार सौ.नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदरील कार्यक्रम बडनेरा आमदार रवीभाऊ राणा,अमरावती खासदार नवनीत राणा व सुनिलभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.यावेळी रामायण या सुप्रसिद्ध धार्मिक नाटिकामधील मंगल भवन,अमंगल हरी या अजरामर गीताचे गायक यांचे सुपुत्र प्रसिद्ध भजन गायक शैलेंद्रजी भारती यांच्या सुमधुर वाणीतून हनुमान चालीसा पठण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्यावर करण्यात आलेल्या चौदा दिवसांच्या जेलमधील अनुभव कथन करीत असतांना खा.नवनीत राणा यांचे अश्रू अनावर झाले.परिणामी सदरील कारवाईबद्दल खा.नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे,तुम किस खेत की मुली हो असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.आपल्या भाषणात खा.नवनीत राणा पुढे म्हणाल्या की,जिथे महाविकास आघाडीच्या सभा होतील तिथे शुद्धीकरण आणि हनुमान चालीसा पठण करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.सदरील कार्यक्रमात आमदार रविभाऊ राणा व खासदार नवनीतजी राणा यांच्या वतीने छत्री तलाव अमरावती येथे १११ फूट हनुमानजीची भव्य मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लप्पीसेठ जाजोदिया,ऍड.प्रशांत देशपांडे,हिंदुस्तान पेपरचे संस्थापक मराठे संतोष साहू,आशिष मालू,शैलेंद्रजी कस्तुरे,बाळूभाऊ इंगोले,शिवाजी केंद्रे,जितू दुधाने,वीरेंद्र उपाध्याय,संजय हिंगनासपुरे,नितीन बोरेकर, विलास वाडेकर,नाना आमले,विकी बीसणे,डॉ.राकेश बडगुजर,धनंजय लोणारे,अविनाश काळे,मंगेश कोकाटे,नितीन मस्के,पराग चिमोटे,आनंद भोयर,महेश किल्लेदार,पवन केशरवाणी,राजेश दातखोरे,पंकज गोहत्रे,अजय बोबडे,दीपक राठोड,दीपक जलतारे,निलेश भेंडे,राजेश सुंडे, नितीन अनासाने,हर्षद रेवणे,देवानंद लकडे,मनोज ढवळे,अनिल शेळके,सचिन सोनोने,बबनराव रडके,तरडेजा काका,गोंडाने काका,कुणाल केवतकर,योगेश जयस्वाल,मंगेश ठाकरे,अमोल कोरडे,किरण श्रीराव,जयंतरावजी वानखडे,जिल्हाध्यक्षा ज्योतीताई सैरीसे,शहर अध्यक्षा सुमतीताई ढोके,अर्चनाताई तालन,शोभाताई किटके,सिमाताई लवणकर,सविता नेवारे,लताजी अंबुलकर,वनिता तंतरपाडे,संगीता काळबांडे,वंदना जामनेरक,मिना आगासे,कल्पना शर्मा,प्रतिभा महाजन,किरण पोकळे,रेखा धोंगे,उज्वल पचलोड,शिल्पा मोकळे,वंदना कन्हाळे,अर्चना खासबागे,वर्षा पकडे,हर्षनंदा भुजाडे,कल्पना बनकर,आशा भस्मे,प्रतिभा बोरकर,मंदा राऊत,चंदा लांडे,सुनिता सावरकर, सविता नेवारे,अरुणा चचाने,मंगला जाधव,सविता मते,माया बिजवे,माया माहुलकर,मंदा तायडे,माला खुरसुडे,निता तिवारी,प्रमिला ससाने, सोनाली बहाळे,बेबी काळबांडे,अल्का मालखेडे,बबीता तिवारी,अर्चना प्रजापती यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.