Just another WordPress site

उद्यापासून नॉट रिचेबल असलेले अजित पवार यांची पुण्यातील कार्यक्रमात हजेरी

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-

एका दिवसापासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे उद्घाटन केल्याने त्यांच्या नॉट रिचेबलच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

अजित पवार यांनी पुण्यातील तीन नियोजित कार्यक्रम काल अचानक दुपारी दोन वाजता रद्द केले होते.सदरील कार्यक्रम रद्दबाबतचे कारण स्पष्ट न आल्याने अजित पवार हे नेमके कुठे गेले?याबाबत चर्चा पाहायला मिळत होत्या.त्यानंतर आजदेखील आठ कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात होती त्यामुळे मागील २४ तासांपासून नॉट रिचेबल असणारे अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत पुण्यातील खराडी भागातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दिसून आले.परिणामी त्यांच्या नॉट रिचेबल बाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.नुकतेच अजित पवार नॉट रिचेबल असल्याने विविध चर्चांना उधान आले होते त्यातच आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्विट केल होते त्यामुळे चर्चांना आणखीच उधान आले होते.अजित पवार हे सकाळी पुण्यात होते व  त्यांनी पुण्यातील तिन्ही कार्यक्रम रद्द केले तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा होत्या.आता अजित पवार पुण्यातील कार्यक्रमात दिसून आल्याने ते या प्रकरणावर ते काय भूमिका मांडतात? हे यावेळी पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.